15 March 2010
Dainik Lokmat, 24 Nov.2014
परवाच्या सायंकाळी माधव भेटला तेव्हाची गोष्ट- दिवस मावळला तसा चेहऱ्यावरचा आनंदही मावळला होता त्याच्या. कारण विचारलं तर अस्वस्थ होऊन बोलत राहिला - यार भीती वाटते या बदलत चाललेल्या जगाची, प्रगती म्हणता-म्हणता आपण इतके दूर गेलो कि कुठे पोहोचायचंच राहून गेलं. किती यंत्रवत वाटतं हे जगणं.आपल्या निरागस स्वप्नांची धडधड ऐकूच येत नाही त्याला!
अजूनही बरंच काही, पण अर्थपूर्ण सांगून गेला तो; आणि तो गेल्यावर मीही तसाच अस्वस्थ झालो. आठवत राहिलं जुनं जग, अन आमच्या अंगणातल्या मातीत पेरलं गेलेलं बालपण...पारिजातकाच्या फुलांसारखं अलगद वेचून ओंजळीत घ्यावं तसंच आणि तितकंच निरागसतेनं वाहत गेलेलं. भोवतालची हवासुद्धा निष्पाप असायची तेव्हा; केवळ श्वासापुरतीच जवळ येणारी अन माणसंही होती फक्त माणसांसारखीच !

त्याच्या बोलण्यानं उगाच दंश केला मनाला. मग बोलत राहिलो स्वतःशीच. नंतर वाटलं, जग नाही यार खरं तर आपणच बदलत चाललोय...! या निसर्गाचा एक प्रवाह आहे..स्वच्छ सुंदर हवा- नेहमीच खेळणारी, नितळ - निळसर आकाश...सुर्य तोच जो जगाच्या अस्तित्वापासून आहे...तेच तारे, तोच समुद्र, डोंगर-दऱ्या, नदी - नाले अन तीच प्रवाळ बेटं..सारं कसं सौम्य पणानं वाहतं आहे. जग आहे तसंच आहे - बदलत चाललोय ते आपण. माणसाच्या आतला माणूस बदलत चाललाय, कारण जगणं थांबवून मगच जगायला सुरुवात केलीय त्यानं. झाडं तोडली उंचच उंच इमारती बांधल्या पण घरत राहणारी माणसं दुरावत चालली. सर्वांना एकत्रित आणण्याचे कार्यक्रम आजही राबवतोय आम्ही पण हस्तांदोलन करताना मनात होणारा आनंद हरवला..माणसांची गर्दी खूप वाढली पण माणुसकी कमी होत गेली. टि.व्ही. वरचे चित्रपट - मालिका बघता-बघता जगण्याचाही फक्त अभिनयच करू लागलो आपण; पण वास्तवातलं जगणं विसरून गेलो. पहिलं बाजारातही एखादा मित्र भेटला तर अतोनात आनंद व्हायचा त्याला अन मलाही, आता भेटण्यासाठी घरी गेलो तरी त्याला आपल्या भेटीत रुची नसते- हव्यास जडलाय आपल्याला फक्त पैशांचा, संपत्तीचा अन माणसांपासून माणसं दूरवण्याचाही !
कुठेतरी एका विचारवंत लेखकानं म्हटलं आहे- people becomes miserable because they constructs a wall instead of bridges अर्थात माणसं दु:खी होतात कारण ते एकमेकांना जोडणारे सेतू बांधण्याऐवजी एकमेकांपासून एकमेकांना दूर करणाऱ्या भिंती रचतात. हाच बदल झाला आपल्या जगण्यात. एकमेकांना घास भरविण्या ऐवजी आपण एकमेकांचे घास ओरबाडू लागलो, परिणामी आपुलकी दूरच राहिली पण आमच्यात जगण्याचीही स्पर्धा सुरु झाली...आम्ही कुठल्यातरी खोट्या अविर्भावात जगात आलो- खूप प्रगती केली आम्ही, नवनवीन शोध लावलेत, नवी तंत्र विकसित केली, रोबोट तयार केले..पण माणसाच्या भावनांचं
काय? मुलांची लग्न जमवितानाही आम्ही व्यवहारच केला. पण त्यांना खरंच प्रेम मिळालं का हे विचारलं देखील नाही. म्हणूच कदाचित, आज आमची स्पर्धा सुरु आहे ती एका अवास्तव जगाशी. मिटलेल्या पापण्यांत सुंदर-सुंदर जगण्याची स्वप्ने रंगवताना आम्ही नेहमीचंच मिटवून घेतलं स्वतःला. विज्ञानाची सांगड घालून नवनवीन शोध लावलेत आम्ही पण प्रेयसीला घेऊन नदी-किनारी निवांत फिरावं इतकी निरागसता हरवून बसलो. लहानपणात आजोबांसोबत देवासामोरची घंटा वाजविण्यासाठी धरलेला अट्टाहास जुन्या पिढीच्या स्मरणात राहील पण आताच्या पिढीतले आजोबाच निवृत्त झालेत त्यांना कोठून मिळणार अजोबंसोबतचं देऊळ आणि घंटानाद ? आमच्या वेळी परीक्षेला सामोरं जाताना रात्र - रात्र वितळवून डोक्यावर घेतल्या आम्ही, पण आताची पिढी सुपरव्हायजरशी सेटिंग करण्यात आपली गुणवत्ता खर्च करताना दिसते हि शोकांतिका आहे. खरं म्हणजे आम्हाला रंगी-बेरंगी फुलपाखरांसारखं जगणं अपेक्षित होतं, पण आमच्या आयुष्याचाच बेरंग होत चाललाय अन आता तर हि दुनियाच आम्हाला रंगहीन वाटू लागलीय..कधी काळी एखाद्या नाटक - चित्रपटातल्या खलनायकाच्या पात्राला तोंड भरून नावं ठेवायचो आम्ही पण आता आमच्यातला प्रत्येकजण या दुनियेच्या रंगभूमीवर खलनायक होवू पाहतोय आणि यापेक्षा एक घोर कटू सत्य हे कि कोणाच्याच प्रामाणिकपणाला दाद देण्याची धमक आमच्यात राहिली नाही, हीही एक शोकांतिकाच आहे.

या वास्तवाचं चिंतन करतानाच मला एक बदल प्रामुख्याने जाणवतो तो म्हणजे माणसाच्या आतला माणूस बदलत चाललाय आणि प्रत्येकजण हेच म्हणतोय कि जग बदलत आहे...नाही. दोस्तहो ..अजूनही सांगतो...तेच तारे, तीच हवा..तेच आकाश...समुद्रही तोच आहे...अजूनही पक्षी घरट बांधून राहतात...जनावरं चाराच खातात , देवळातल्या घंटेचा नाद आजही मधुरच आहे..आईचं प्रेम आजही अवीट आहे..दोस्तांनो आयुष्य बदलत आहे...आयुष्य बदलत आहे..शेवटी कविवर्य मर्ढेकरांनी म्हटलंय -
अजून येतो वास फुलांना ..
अजून माती लाल चमकते,
खुरट्या बुंध्यावरी चढुनी
अजून बकरी चारा खाते...
- कृष्णा बेलगांवकर

No comments:
Post a Comment